महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महाराजांच्या कीर्तनाचा नेत्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी उपयोग केला जात आहे. प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, आणि जनजागृती करणाऱ्या महाराजांच्या कीर्तनांनी मतदारांमध्ये नेत्याची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न आहेत.
वर्षभरातील कीर्तनांची शंभर टक्के बुकिंग पैकी 90% बुकिंग राजकीय नेत्यांनी केल्याचे समजते. लोकांचे आकर्षण असणारे परराज्यातील महाराजही यावर्षी महाराष्ट्रात दरबार आणि प्रवचने घेत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता धार्मिक वातावरण निर्माण करत महाराजांचा राजकीय उपयोग केला जात आहे का? असा प्रश्न पडला आहे.