महाराष्ट्र

CM Eknath Shinde : ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या परिसरात साचले पाणी; पालिका यंत्रणेची धावाधाव

ठाणे शहरात आज (गुरूवार) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी भागातील निवासस्थान परिसरातील सखल भागात पाणी साचले होते.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कोकणात येत्या 4 ते 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच ठाणे शहरात आज (गुरूवार) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी भागातील निवासस्थान परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. हा परिसर जलमय झाल्याचे कळताच पालिका यंत्रणेची तारंबळ उडाली आणि त्यांनी याठिकाणी धाव घेऊन पंपांच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा उपसा केला. या भागात पावसाचे पाणी पुन्हा साचू नये, यासाठी पालिकेने याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप ठेवण्याबरोबरच त्याच्या संचलनासाठी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजले आहे.

आज मुंबईसह उपनगरात पावसाने चांगलच झोडपलं. त्यामुळ अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दरम्यान ठाणे शहरात सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी भागातील ‘शुभ-दीप’ या बंगल्याच्या परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. या परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी याबाबत ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिली. त्यानंतर या विभागासह पालिका यंत्रणाची तारंबळ उडाली. आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवानाने पंप लावून साचलेल्या पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरु केले. काही वेळात परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला.

या सखल भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुन्हा पाणी साचू शकते. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप ठेवण्याबरोबरच त्याच्या संचलनासाठी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha