कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
यावेळी पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या टोल फ्री केल्या जातील. जादाच्या ४ हजार ७०० एसटी सोडण्यात येतील. गरज लागल्यास आणखी एसटी बसेस सोडण्याच्या सूचना दिल्या जातील, असं शिंदेंनी सांगितलं. वारी यशस्वी होईल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पांडुरंगाच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री म्हणून पूजा करण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण कुटुंब पांडुरंगाच्या पुजेला जाणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.