महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर गिरीश महाजनांना मुख्यमंत्री पद मिळणार : एकनाथ खडसे

Published by : Vikrant Shinde

गिरीश महाजन (Girish Mahajan) व एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्यात नेहमीच टीकात्मक भाष्य सुरू असतात. कधी खडसे महाजनांवर ते बुधवार पेठेत गेल्यानंतर त्यांचा कोरोना आजार बरा होईल, अशी टीकात्मक टिप्पणी करतात. तर महाजन खडसे यांच्यावर टीका करतांना म्हणतात की, त्यांचा कार्यकाळ संपला असून ते आता खुर्ची नसल्यामुळे काहीही बरळत असतात.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जोपर्यंत विधानसभेत आहेत. तोपर्यत मुख्यमंत्री पद महाजनांना मिळू शकत नाही. ते मिळवण्यासाठी फडणवीस यांची केंद्रात वर्णी करावी लागेल. तेव्हा महाजनांना मुख्यमंत्री पद मिळू शकणार असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते खडसे यांनी म्हटले आहे.

रोहिदास पाटील, बळीराम हिरे, मधुकरराव चौधरी, एकनाथ खडसे यांच्यासारखे मातब्बर नेते असतांना फडणवीस यांना संधी मिळाली. त्यामुळे जोपर्यंत फडणवीस दिल्लीत जात नाहीत, तोपर्यंत गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री पद मिळणे शक्य नाही आणि हे वास्तव आहे, असं खडसे म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी