Eknath Khadse Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

"मी पुन्हा येईन'' या नादात माझचं फोन टॅपिंग...एकनाथ खडसेंचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा

Published by : left

मंगेश जोशी, जळगाव | फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) आता माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. "मी पुन्हा येईल" यातूनच हे फोन टॅप (Phone Tapping Case) करण्याचा नीच व हलकटपणा करण्यात आला असल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे.

फोन टॅपिंग (Phone Tapping Case) प्रकरणा संदर्भात बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, समाज विघातक कृत्य व टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये माझा सहभाग असल्याचा आरोप माझ्यावर लावून माझ्यासह माझा कार्यकर्ता अशोक लाडवंजारी व पीए चा फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप केला.त्याचसोबत गृह सचिव व मुख्यमंत्री यांच्या आदेशाने रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचे ही एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले आहेत.

ज्यांना मी मोठं केलं तेच मला आज छळत असून या प्रकरणातील सत्य लवकरच जनतेसमोर येणार असल्याचे खडसे (Eknath Khadse) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच "मी पुन्हा येईल" यातूनच हे फोन टॅप करण्याचा नीच व हलकटपणा करण्यात आला असल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी करून नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी