बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे.
आज रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार असून खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. शरद पवार गट शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचं कार्यालय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची शक्यता आहे.