महाराष्ट्र

दौंडमध्ये राज्य राखीव पोलीस भरती प्रक्रियेत डमी उमेदवार

Published by : Lokshahi News

राज्य राखीव पोलीस दलात भरतीसाठी डमी उमेदवार पाठविल्याचा प्रकार दौंड मधील गट क्रमांक 7 मध्ये उघडकीस आला. कुसडगाव मधील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया दौंड मधील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक सातच्या मैदानावर लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू होती.

मात्र भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांचे कागदपत्र तपासत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर याठिकाणी राहणाऱ्या प्रकाश त्रिभुवन या 27 वर्षीय उमेदवाराच्या जागेवर गजानन ठाकूर हा शारीरिक चाचणी देण्यात साठी डमी उमेदवार उभा केल्याचे कागदपत्रे पडताळणीत लक्षात आल्याने राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलिस निरीक्षकांनी दौंड पोलिस ठाण्यात डमी उमेदवार आणि त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मूळ उमेदवार आणि डमी उमेदवार या दोघांनाही अटक करण्यात आली.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...