संदीप शुक्ला | बुलढाणा जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलीसाने धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातला व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या पोलीसावर कारवाई होणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोरोनाग्रस्त असलेल्या आरोपीला उपचारासाठी सोबत घेऊन आलेल्या मद्यधुंद पोलिसाने कोविड सेन्टरमध्येच धिंगाणा घातल्याचा प्रकार बुलढाण्यातील अपंग निवासी विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये घडला. दरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी या पोलिसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसाने उलट त्यांनाच दमदाटी केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यात गंभीर बाब म्हणजे या पोलिसासोबत आरोपी देखील होता त्यामुळे कायद्याचे तीनतेरा वाजवणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.