एनसीबीने मुंबईतील मालाड येथील बेकरीवर छापेमारी केली आहे. या छाप्यादरम्यान धक्कादायक खुलासा झालाय. संबंधित बेकरीत केक आणि पेस्ट्रीमध्ये ड्रग्ज विकले जात होते. बेकरीच्या माध्यमातून असे ड्रग रॅकेट उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे बेकरी व्यवसायाच्या आडून ड्रग्जची विक्री केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. छापेमारी दरम्यान येथून 160 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. केकमध्ये ड्रग्ज भरून ते हाय प्रोफाइल भागात विकले जात होते.
हा ड्रग्जचा धंदा कधीपासून सुरू होता, याची चौकशी एनसीबी करत आहे. या बेकरीचे ग्राहक कोण आहेत. आणि यामागील मास्टरमाइंड कोण आहे, याचा शोध सुरू करण्यात आला आहे. सध्या एनसीबीने दोन जणांना अटक केली आहे.