राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा दिली आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. गेल्या काही महिन्यांपासून निगवेकर आजारी होते.
सात वर्षापूर्वी त्यांना ब्रेन कॅन्सर झाला होता.सुमारे वर्षभरापासून ते घरीच होते.शुक्रवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास हृदय बंद पडल्याने राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.