महाराष्ट्र

Dr.Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या सुट्टी जाहीर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब, दलित व मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले.

Published by : Team Lokshahi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब, दलित व मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही सुट्टी देण्यात आली असल्याचं शासकीय परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. हा आदेश मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. 

दरम्यान, या दिवशी सर्व कार्यालये सुरू असल्याने अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. राज्यातील अनेक संघटना याच पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांपासून सुट्टी मिळावी, अशी मागणी करत होते. त्यातच 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समन्वय समितीने मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. सन 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती