राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी भूमिका कॉग्रेस नेत्यांनी सिल्वर ओकवरील बैठकीत मांडली होती. तर राष्ट्रवादीही राजीनामा न घेण्यावर ठाम होती. त्यात आता मुख्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी शरद पवार वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहेत. या बैठकीत नवाब मलिकांसंदर्भातील मुख्यमंत्र्यांचा निर्णय जाणून घेत आहे. त्यात शिवसेनेचीही भूमिका समोर आली आहे.
राष्ट्रवादीसह शिवसेनाही नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये, हा निर्णय घेत असल्याची माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही भुमिका मांडली आहे. महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू.कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे.., असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.