प्रतिनिधी : सुरेश वायभट
कोरोनाच्या काळात ऑनलाईन शाळा सुरू आसल्याने अनेक विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षणापासुन वंचित रहावे लागले तसेच कोरोना काळात विद्यार्थी संगणक साक्षर व्हावेत यासाठी अक्षर भारती पुणे या संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन पैठण तालुक्यातील पाटेगाव येथिल कौशल्य विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना 100 लॅपटॉप चे वाटप करण्यात आले. अक्षर भारती, आर्यभट्ट ऑनलाईन संगणक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा हेईल असे शाळेचे प्रचार्य निलेश गायकवाड यांनी सांगितले. यावेळी अक्षर भारतीचे संतोष शेळके, पाटेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष शिंदे, प्राचार्य निलेश गायकवाड, संगीता सहानी,सामाजिक कार्यकर्ते भागिनाथ तट्टू ,पत्रकार दादासाहेब घोडके, सुरेश वायभट, गोविंद बावणे, वैभव तट्टू, शंकर कदम, साईनाथ कर्डिले, भगवान डोंगरे, संजय रुपेकर, सहशिक्षक बालाजी नलभे, नंदकिशोर पातकळ, विजय सपकाळ, श्रीमती पाटील स्वप्नजा, श्रीमती अनिता तारख,श्रीमती धायगुडे शितल, सोन्याबापु पालवे, प्रवीण काळे, अमोल गायकवाड, आकेश दांडेकर, प्रकाश कामडी , भाऊसाहेब गायकवाड कैलास सोनटक्के, महेश गायकवाड, विठ्ठल त्रिभुवन, सतीष पवार यांच्यासह विद्यार्थी, पालक शिक्षकांची उपस्थिती होती.