Amit Wankhede
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींसह हरिनामात दंगले जागतिक नेते, जगभरातील नेत्यांची ग्लोबल वारी

महाराष्ट्रातील वारी जागतिक पातळीवर पोहचली आहे.

Published by : shweta walge

आषाढी एकादशीनिमित्त संपुर्ण महाराष्ट्रात आज उत्साह रंगला आहे. अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तित लिन झाला आहे. पण आता महाराष्ट्रातील वारी जागतिक पातळीवर पोहचली आहे. जगातील दिग्गज नेते आषाढी वारीत सहभागी झाले आहेत. ही कमाल केली आहे आमित वानखेडे यांनी.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी महाराष्ट्रातील दिवंगत नेत्याचे डिस्नी स्टाईलमध्ये कार्टुन साकारले आहेत. आज आषाढी एकादशीनिमित्त अमित वानखेडे यांनी जगभरातील नेत्यांचे फोटो साकारले आहेत. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील अनेक नेते वारीत सहभागी झाले आहेत. अमित वानखेडेंनी ट्विटरवर जागतिक नेत्याचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी या पोस्टवर ग्लोबल वारी, ग्लोबल वारकरी, हरिनामात दंग जागतिक नेते अशी टॅगलाईन दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अमित वानखेडे यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून चित्र साकारले होते. यामध्ये राष्ट्रावदीच्या नेत्यांचे, महाराष्ट्रातील दिवंगत नेत्यांचे, आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचे लष्करी गणवेशातील चित्र साकारली आहेत.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का