राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा असा काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अडचणीत आलाय. त्यावर भाजप का बोलत नाही? गुंडाची चर्चा त्या प्रवृत्तीचे लोक करतात. त्यावर मी बोलणार नाही. समोरचा व्यक्ती सांगतोय मग हे गुंड आहे का?, असं सांगतानाच गुंडाला प्रेमाची भाषा कळत नाही. त्यामुळे गुंडाला मारणार असं मी म्हणालो. याचा अर्थ जीवे मारणार असा होत नाही. असे नाना पटोले म्हणाले.
यासोबतच आज ऊर्जा खात्याची परिस्थिती सर्वांसमोर आहे. हे खातं मागच्या सरकामुळे अंधारात गेलं. थकबाकी वसुल केली नाही तर हे खातं अंधारात जाईल. भाजप हा डबल गेम खेळत आहे. चालू बिल भरण्यास सांगितले होते. त्याला सुद्धा भाजपा विरोध करत आहे. त्यांचं भाजप राजकारण करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
लोक भाजपला हसतात. त्याची बायको पळते, त्याच नाव मोदी ठेवलं जातं. बाकी काही राहिलं नाही आता. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांची लोकं आहोत. आमच्या मनात असे विचार येत नाही. त्यांच्याच मनात विचार येतात, असे देखिल नाना पटोले यांनी म्हटले आहे.