मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray)यांनी ४ तारखेचा अल्टीमेटम दिला. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ (rajneesh sheth) यांनी पत्रकार परिषद देत आम्ही तयार आहोत, राज्यातील कायदा व सुव्यवस्था (law and order)बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करु, असा ईशारा त्यांनी दिला.
रजनिश सेठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संपुर्ण राज्यातील पोलिसांना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासंदर्भात योग्य खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. कायदा कोणी हातात घेतल्यास त्यांच्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.तसेच यापुर्वी समाज कंटक व गुन्हेगारांवर आम्ही कारवाई सुरु केली आहे. ठिकठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेतली गेली आहे. एसआरपीएफ व होमगार्ड संपुर्ण राज्यात तैनात करण्यात आली आहे. राज्यात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेबाबत कारवाईचे संकेत
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत औरंगाबादचे पोलिस आयुक्तांनी अभ्यास केला आहे. ते या संदर्भात योग्य ती कारवाई करतील.
काय आहे पोलिसांचा प्लॅन
- १५ हजार लोकांना नोटीस देण्यात आली आहे.
-८५ हजार एसआरपी जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- होमगार्डची नियुक्ती करण्यात आली.