महाराष्ट्र

नवी मुंबई बेलापूरमध्ये 4 मजली इमारत कोसळली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले...

नवी मुंबई बेलापूरमध्ये 4 मजली इमारत कोसळ्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नवी मुंबई बेलापूरमध्ये 4 मजली इमारत कोसळ्याची घटना घडली आहे. शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस इमारत पहाटे कोसळल्याची माहिती मिळत आहे. या इमारतीत 2 नागरिक अडकल्याची माहिती आहे. इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकले त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिका कर्मचारी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचाव कार्य चालू असून, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नवी मुंबई भागात शहाबाजगाव येथे आज पहाटे 4 मजल्यांची एक इमारत कोसळल्याची घटना घडली असून त्यातील सुमारे 50 निवासींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 2 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 2 नागरिक दबले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, एनडीआरएफची चमू लगेच घटनास्थळी पाचारण करण्यात आली. नवी मुंबई महापालिका आयुक्त सुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बाहेर काढलेल्या नागरिकांची महापालिकेच्या निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड