महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट

Published by : Lokshahi News

कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शिवप्रेमी आक्रमक झाले असून राजकीय वातावरणही तापले आहे. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे, कर्नाटकमध्ये भाजप सरकारचे असल्याने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी या घटनेवर चुपी साधल्याचा आरोप होता. तर आता या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट समोर आले आहे.

'आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत.त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच! ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच!' असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.

Vasai: वसईत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे बेमुदत आंदोलन

मुस्लिम आंदोलकांनी द्वेषपूर्ण भाषणासाठी भाजप आमदार आणि धर्मोपदेशकावर कारवाईची मागणी करत मुंबईकडे काढला मोर्चा

Oval Maidan: ओव्हल मैदान, इतर क्रीडा स्थळांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा, महाराष्ट्र लोकायुक्तांचे सरकारचे आदेश

Mumbai Metro-3 | पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत;पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण

Navratri 2024: "या" कारणामुळे नवरात्री 9 दिवस साजरी केली जाते, जाणून घ्या...