विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pendrive Bomb) टाकला आहे. विधानसभेत (VidhanSabha) भाषणादरम्यान त्यांनी हा बॉम्ब फोडत आरोप केले आहेत. या पेन ड्राईव्ह बॉम्बमधून (Pendrive Bomb) त्यांनी वक्फ बोर्डवर (Maharashtra State Waqf Board) लक्ष्य केले आहे. वक्फ बोर्डावरील (Maharashtra State Waqf Board) नियुक्त सदस्याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Daud Ibrahim) कसे संबंध आहेत, हे देखील फडणवीसांनी निदर्शनास आणून दिलं. तसेच, या सदस्याची नियुक्ती राज्य सरकारमधील अल्पसंख्याकमंत्री असलेल्या नवाब मलिकांकडून (Nawab Malik) झाली असल्याचा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज विधानसभेत (VidhanSabha) बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभेत (VidhanSabha) आज दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pendrive Bomb) टाकला. या पेन ड्राईव्हमध्ये (Pendrive Bomb) फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) वक्फ बोर्डात (Maharashtra State Waqf Board) दाऊदच्या माणसांची नियुक्ती केल्याचा आरोप केला आहे. वक्फ बोर्डात (Maharashtra State Waqf Board) नियुक्त केलेले डॉ. लांबे आपला विस्तृत परीचय देतात, या पेन ड्राईव्हमध्ये त्याची संपुर्ण माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
"वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले डॉ. लांबे हे आपला विसृत परिचय देत असल्याचा ऑडिओ या पेनड्राईव्हमध्ये देखील आहे. डॉ. लांबे यांचा मोहम्मद अरशद खानशी झालेला संवाद त्यामध्ये आहे. परिचया व्यतिरिक्त वक्फ बोर्डात कमाई कशी करायची याची विस्तृत उल्लेख त्यामध्ये आहे." असंही फडणवीस यांनी यावेळी सभागृहात सांगितलं. पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "यामध्ये डॉ. लांबे म्हणतात माझे सासरे दाऊदचे राईट हॅण्ड आहेत आणि माझं लग्न हे हसीना आपा ने जमवलं होतं. हसीना आपा म्हणजे दाऊची बहीण आणि सोबत इक्बाल कासकरची पत्नी म्हणजे दाऊची वहिणी. जरा देखील काही झालं तर गोष्ट तिथपर्यंत पोहचते, कराचीपर्यंत." असं आपल्या वक्फ बोर्डाचे सदस्य सांगत आहेत. असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत बोलून दाखवलं
तसेच वक्फ बोर्डात कमाई कशी करायची याची चर्चा दोन माणसं करत आहेत. या संबंधित ऑडीओ क्लिप (Audio Clip) दिली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोपांवर आता वक्फ बोर्ड (Maharashtra State Waqf Board) आपली भूमिका काय मांडले हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वक्फ बोर्डात नियुक्त डॉ. लांबे कोण ?
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात एकूण 10 सदस्य कार्यरत आहेत. यामध्ये रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली या निर्वाचक गण मध्ये डॉ.मुद्दसीर लांबे आहेत. त्यांची नियुक्ती वक्फ 2018/ प्र.क्र.122/ का.4,दि.13 सप्टेंबर,2019 झाली आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. महाराष्ट्र राज्यातील वक्फांची संख्या सुमारे २७,००० इतकी आहे. यापैकी सुमारे ७० टक्के वक्फ जमिनी अतिक्रमणाखाली आहेत.