महाराष्ट्र

Devendra Fadnavis| अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Published by : Lokshahi News

"मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, पण प्रत्यक्षात शार्जिलबाबत महाविकास आघाडी सरकारने काय केले?" असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे की "आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच' प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले?" असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

तसेच "मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते" असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

पुढे "खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. 'न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा'विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी" असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोण आहे शर्जिल उस्मानी ? (Who is Sharjeel Usmani?)
शरजील उस्मानी हा अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. एल्गार परिषदेमध्ये 'हिंदू सडा हूआ है'असे आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू धर्मियांच्या भावना शर्जिल उस्मानीने दुखावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपनं त्याच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती