राष्ट्रवादी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा न दिल्यास चुकीचा संदेश जाईल. राजीनामा घेणार नाही ही सरकारची भूमिका चुकीची आहे. तसेच दाऊदला मदत करणाऱ्या मंत्र्यांला सरकार वाचवत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
नवाब मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषद घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दाऊद भारतातून टेरर फंडींग करतोय. मंत्री नवाब मलिक यांनी घेतलेली जमीन बॉम्बस्फोटातील आरोपांकडून घेतलीय. त्यातला एक हसीना पारकरचा ड्राईव्हर आहे. जमीनीच्या मालकांनी सांगितलं पैसे नाही मिळाले, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
एखाद्या मंत्र्याने बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन का घेतली? हसीना पारकशी व्यवहार का केला. या व्यवहारानंतर तीन वेळा बॉम्बस्फोट. जे लोकं बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना पैसे देणे निंदनीय असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई नियमानुसार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा
कुठल्याही राजकीय पक्षाने टेरर फंडिंग होण्याला निषेध केला पाहिजे. यात राजकारण केलं नाही पाहिजे, सर्वांनी एकत्र दाऊदविरोधात भूमिका मांडली पाहिजे. तसेच माझ्याकडे जी कागदपत्र होती ती मी ईडी आणि एनआयएला दिली आहेत. असेही फडणवीस म्हणाले. नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा. देशात यामुळे अतिशय चुकीचा संदेस जाईल की दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय. असेही ते म्हणाले.