Devendra Fadnavis Latest News : आमचं एक तत्व पक्क आहे की, गडचिरोलीतील जल, जमीन आणि जंगल आमच्या आदिवासींनी सुरक्षीत ठेवलं आहे. त्याला कोणताही धोका आम्हाला निर्माण करायचा नाही. कुणाच्याही जमिनी कवडीमोल भावाने घ्यायच्या नाहीत. ठाकूर देवांचं आराध्य दैवताचं जे काही स्थान आहे, त्या स्थानाला धोका निर्माण होईल, अशाप्रकारचं खोदकाम आम्हाला करू द्यायचं नाहीय. त्याच्या आसपासही आम्हाला करायचं नाहीय. त्यामुळे हे भ्रम पसरवले जात आहेत, हे चुकीचे आहेत. आम्हाला विकास करायचाय, विनाश करायचा नाही.
प्रत्येक एमओयूमध्ये आम्ही अट टाकली आहे की, ८० टक्के रोजगार स्थानिकांना द्यावा लागेल. आदिवसींसह इतर लोकांना द्यावा लागेल. आदिवासींचं ट्रेनिंग करावं लागेल, कारण त्यांच्या जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे. एकादशीच्या पवित्र दिवशी गडचिरोलीत १० हजार कोटींच्या निधीतून इंटिग्रेडेट स्टील प्लँट सूर्जागड स्टील प्रायव्हेट लिमिटेड याचं भूमिपूजन आम्ही केलं आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, आमचा हा प्रयत्न आहे की, १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान पहिल्या टप्प्याचा निधी आम्ही देणार आहोत. ३१ ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील, त्यांचे अर्ज जुलैमध्ये आले असं समजून त्यांनाही पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे देणार आहोत. त्यामुळं कुणाचच नुकसान होणार नाही.