पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथी भालके यांचा 3700 मतांनी पराभव केला. या निकालानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
"मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता कोरोनाशी लढायचं आहे. ही वेळ नाही. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळविले आहे", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"भाजपवर जनतेनं विश्वास दाखवला. त्यामुळे मी पंढरपूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेना केलाय.
दरम्यान महाविकास आघाडीवरहि त्यांनी टीका केली. या निवडणुकीत राज्य सरकारचे तीन पक्ष उतरले. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या पद्धती अवलंबले. त्यांनी प्रशासनाचा गैर वापर केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरउपयोग केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.