Devendra Fadnavis Team Lokshahi
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : विधान परिषदेच्या सर्व जागा जिंकणार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत विजयानंतर भाजपकडून (BJP) राज्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एक विजयाने आम्ही समाधानी नाही. तर विधान परिषदेचे सर्व जागा जिंकणार तसेच 2024 लोकसभा विधानसभा भाजप पूर्ण ताकदीने जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आजारी असतानाही मतदानासाठी ते सभागृहात आले. त्यांचे पक्षासाठीचे योगदान मोलाचे आहे. तसेच, महाराष्ट्रातील टीमने नियोजनपूर्वक काम केल्याने विजय मिळाला आहे. परंतु, एक विजयाने आम्ही समाधानी नाही. तर विधान परिषदेचे सर्व जागा जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, 2024 लोकसभा विधानसभा भाजप पूर्ण ताकदीने जिंकणार, असेही सांगितले.

शिवसेनेच्या पराभावावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने अंतर्मुख होऊन विचार करावा. सरकारच काम थांबलेलं असते. तेव्हाच जनतेच्या रोषाला आमदारांना सामोरे जावे लागते. अडीच वर्षांपासून राज्य ठप्प आहेत. विकासकामे बंद पडली आहेत. यामुळे अनेक आमदारांनी सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून आम्हाला मतदान केले. यामुळे जनतेच्या अपेक्षा सरकारांकडून नाही तर आमच्याकडून आहेत त्यांना वाटते आम्ही त्यांचे प्रश्न मांडू, असे त्यांनी म्हंटले आहे.

एकेकाळी असे म्हटलं जायचं की शरद पवार माणसं गोळा करतात. आज आम्ही माणसं करतो. आमदारांना घोडा म्हणणे ही त्यांची संस्कृती आहे. राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे. आमचा तिसरा उमेदवार त्यांच्यापेक्षा अधिक मतांनी जिंकले आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली आहे. सरकारमध्ये असणारे आमदार नाराज आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याविषयी फडणवीस म्हणाले, मंत्री मंडळातील काही मंत्री जेलमध्ये असताना देखील त्यांच्या खात्याचे निर्णय व त्यांचे फोटो सोशल माध्यमात टाकले जातात. यावरून असे म्हणता येईल की सध्या वर्क फ्रॉम जेल सुरू आहे, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला आहे.

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल