महाराष्ट्र

अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकता नाही; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Published by : Lokshahi News

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे. बुधवार २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना सदनात गोंधळ घातल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. यामुळे भाजपची बाजू विधानसभेत कमकुवत होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेत सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी रणनिती आखण्याची शक्यता आहे.

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार आशिष शेलार, तसेच इतर काही बडे नेते या बैठकीला उपस्थित असतील. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची मानली जात आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची अनेक प्रश्नांवर कोंडी कऱण्यासाठी या बैठकीमध्ये रणनिती आखण्यात येऊ शकते. यावेळी अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकता नाही असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.

भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सद्स्यांनी घातलेल्या गोंधळामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आमदारांच्या निलंबनाचे प्रकरणही न्यायालयीन आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आमदारांना अद्याप दिलासा मिळाला नाही. होयकोर्टात जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे हिवाळी अधिवेशनात १२ आमदार उपस्थित नसतील याचा भाजपचा मोठा फटका बसणार आहे. या आमदारांच्या विषयांवरही बैठकीत चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका