यावर्षी पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालतं. मग अधिवेशन का नाही, असा प्रश्न करत विरोधी पक्षाने विधीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. लोकशाहीची थट्टा सुरु असल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.
यावेळी महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे. राज्यात राज्यात मंदिरे बंद पण मदिरालये सुरू आहेत. महा विकास आघाडी सरकारमध्ये भानगडी सुरू आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचे हाल का ? असा सवाल त्याने केला.
त्याचा प्रमाणे देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकांच्या मनात
मोदी आहेत त्यामुळे २०२४ पुन्हा मोदींची लाट आणू असे देखील त्यांनी यावेळी सांगितेले.