महाराष्ट्र

खास शेरो शायरी करत देवेंद्र फडणवीसांनी नीरजचं केलं कौतुक

Published by : Lokshahi News

टोक्यो ऑल्मिपिक भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचला.जगभरातून त्याच कौतुक होतंय.नीरजने केलेल्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली असून, त्याचे प्रत्येकजण कौतुक करत आहे. सोशल मीडियावर तर कालपासून त्याच्या कामगिरीचं कौतुक व त्याच्यावर शुभेच्छांचा अक्षरक्ष: वर्षाव सुरू आहे. त्याचबरोबर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मीडियाद्वारे नीरज चोप्राचं खास शब्दांमध्ये कौतुक केलं आहे.

"ये भाला तो वीर शिवा का और रणभेदी राणा का है, भारत माँ का सपूत नीरज बेटा तो हरियाणा का है। आज तिरंगा ऊँचा चढ़ते देख सीना चौड़ा है, और राष्ट्रगान की धुन पर अपना लहू रगों में दौड़ा है। याद करें जिस युद्धने बरसों गहरा घाव छोड़ा है, उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है".अशा शब्दात फडणवीसांनी नीरजचं कौतुक केलं आहे.

सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचं अभिनंदन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत नीरजचं अभिनंदन केलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण