महाराष्ट्र

आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा, तहसीलदाराला दिली होती धमकी

Published by : Lokshahi News

सुरज दहाट, प्रतिनिधी

वरुड मोर्शी मतदार संघाचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी २०१३साली शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन माईक अंगावर फेकला होता. दरम्यान तब्बल ७वर्षांनंतर अमरावती अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल देत आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

१५ मे २०१३ रोजी पंचायत समिती सदस्य असताना देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तहसील कार्यालयात गेले होते. यात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशीरा का बंद होते. तुम्ही माझा फोन कट का केला असा दम देवेंद्र भुयार यांनी तहसीलदार राम लंके यांना भरला होता.

तहसीलदार लंके यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यात तहसीलदार लंके यांनी वरुड पोलीस ठाण्यात देवेंद्र भुयार यांच्या विरोधात वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये ३५३, १८६, २९४, ५०६ असे गुन्हे दाखल झाले होते. यात दोषापत्र दाखल करण्यात आल्याने व यात गुन्हा सिद्ध झाल्याने अमरावती जिल्हा न्यायालयाने यात महत्त्वाचा निकाल देत देवेंद्र भुयार यांना ३ महिने सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा फर्मावली आहे. तसेच भरपाई म्हणून तहसीलदार लंके यांना १० हजार रुपये सुद्धा द्यावे, असे न्यायालयाने निकालात सांगितले.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती