कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांचा विकास झाला नसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि 27 गाव संघर्ष समितीचा संघर्ष काही नवीन नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सत्तावीस गावांना आपल्या कार्यक्षेत्रात घेऊन त्यांचा विकास करण्याचे ठरवले होते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या या 27 गावांचा विकास न होता त्यांची अधोगती झाल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.
विकासकामाच्या नावाखाली एक टक्का विकास आणि 99 टक्के भ्रष्टाचार हे समीकरणच झालं असून महापालिकेत समाविष्ट होण्यापेक्षा ग्रामपंचायत कार्यक्षेत्र योग्य असल्याचा निर्वाळा संघर्ष समितीने दिला आहे.