आषाढी पायीवारी बाबत पालखी सोहळा विश्वस्त ,वारकरी संघटना यांच्या मागण्या पुण्याच्या विभागीय आयुक्तनाच्या बैठकीत प्रशासनाने अमान्य केलाय, शासनाच्या नियमानुसारच आषाढी वारी होणार असल्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत, पालखी सोहळा हा एस टी तुन पंढरीला जाणार आहे, शासनाच्या या निर्णयाला वारकरी संप्रदयातून प्रचंड विरोध वाढायला लागलाय, अखिल भारतीय वारकरी भाविक संघटनेने बैठक घेऊन शासनाच्या निर्णयाला विरोध केलाय, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी 30 जून ला आझाद मैदानावर भजन आंदोलन करण्याचे ठरवलंय ,याही पुढ जाऊन शासनाने पायी वारी ला परवानगी दिली नाही तर 3 जुलै ला आळंदीहून दहा दहा वारकर्यांच्या ग्रुप करून पंढरीची आषाढी पायी वारी करणार असल्याचे अखिल भारतीय वारकरी भाविक संघटनेचे ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी सांगितलंय.