जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्याच्या पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत. कोल्हापुरात डेल्टाचे सात रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडालीय. पालकमंत्री सतेज पाटील यानी या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातले सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. नागरिकांनी योग्य दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रँडम सॅम्पल आपण दिल्लीला पाठवत असतो. दुर्देवाने सात रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळले आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सॅम्पल गोळा करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. दरम्यान कोरोना अजून संपलेला नाही.
कोल्हापूरचा पॉझिटिव्ह रेट 2.61 टक्क्यांवर आला आहे. तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात दिवसाला सातशे मेट्रिक टनची ऑक्सिजनची आवश्यकता लागेल त्यावेळेस निर्बंध कडक करावे लागतील त्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. तसेच डेल्टाच्या या रुग्णांवर तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे ट्रेंसिंग करून प्रोटोकॉल प्रमाणे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.