संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North By Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. या विजयानंतर आता चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्याविरोधात बॅनरबाजी करत त्यांना आता ट्रोल केले जात आहे. त्यातच आता पुण्यातही त्यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
कोल्हापूरात चंद्रकांत पाटील (chandrakant patil) प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दादा हिमालयात जावा अशीही घोषणा केली होती. या कार्यकर्त्यांच्या घोषणांची जागा आता बॅनरबाजीने घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जात आहे.
पुण्याच्या कोथरूड मतदार संघात आता चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राजेश पळसकर यांनी ही बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमध्ये हिमालयाचा फोटो लावून त्यामध्ये कमंडल आणि रूद्राक्ष याचे फोटो आहेत. तर बॅनरच्या मधोमध चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय, असा मजकूर लिहण्यात आला आहे. या बॅनरमधून शिवसेनेकडून त्यांनी डिवचण्यात आले आहे.