महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिपक केसरकर म्हणाले...

राज्यपालांकडे एकनाथ शिंदेंनी सोपवला राजीनामा

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रि‍पदाचा दिला राजीनामा

  • राज्यपालांकडे शिंदेंनी सोपवला राजीनामा

  • दिपक केसरकर यांनी दिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच शपथविधी पार पडेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. उद्या भाजपची गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर तिनही नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचे सरकार स्थापन होईल.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. मात्र तिनही पक्षांनी स्पष्ट सांगितले आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील. असे दिपक केसरकर म्हणाले.

Latest Marathi News Updates live: ईव्हिम मशीनला विरोध करणारी याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

Rohit Pawar Tweet | 'गुजराती EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही?' रोहित पवार यांचा सवाल

Vishwajeet Kadam | ईव्हीएममध्ये गोंधळ किंवा घोळ, काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांच्याकडून संशय व्यक्त

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच ज्याच्या 'वैभव'! अश्या या 13 वर्षीय खेळाडूसाठी राजस्थानने मोजले 1.10 कोटी, पण त्याला IPL 2025मध्ये संधी मिळेल का?

Mahayuti | Devendra Fadnvis - Eknath Shinde यांच्यामध्ये दुरावा? Ajit Pawar साधली योग्य टायमिंग?