महाराष्ट्र

अबब! 'त्या' आधार कार्डवर चक्क उपमुख्यमंत्र्यांचा फोटो

शासनाने प्रत्येकाला आधार कार्ड काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जन्मलेल्या बाळापासून तर वृद्धापर्यंत प्रत्येक जण हे आधार कार्ड काढत असतात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अनिल ठाकरे |चंद्रपूर : शासनाने प्रत्येकाला आधार कार्ड काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जन्मलेल्या बाळापासून तर वृद्धापर्यंत प्रत्येक जण हे आधार कार्ड काढत असतात. परंतु, शंकरपूरमध्ये एका मुलाच्या आधार कार्डवर मुलाचा फोटो न छापता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापला. यातून आपल्या अकलेचे दिवाळे आधार कार्ड केंद्रवाल्यांनी केले आहे.

जिगल जीवन सावसाकडे हा आठ वर्षांचा मुलगा आहे. तो सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील रहिवासी आहे. त्याची आईचे माहेर शंकरपूर जवळील शिवरा येथील आहे. तिने 2015 मध्ये शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एका बाळाला जन्म दिला. ते बाळ सहा महिन्याचे झाल्यावर त्याचे आधार कार्ड काढण्यासाठी शंकरपूर येथे 2016 मध्ये शिबीर घेण्यात आले होते. त्या शिबिरात त्या मुलाचेही आधारकार्ड काढण्यात आले. परंतु, त्या कार्डवर त्या बाळाचा फोटो न येता चक्क तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आलेला आहे.

एवढी मोठी चूक ज्यांनी आधार कार्ड काढलं त्या ऑपरेटरच्या लक्षात आली नाही ही एक शोकांतिका आहे. ही चूक त्या मुलाच्या आईच्या लक्षात आली. परंतु, लहान मुलांचे आधारकार्ड दर पाच वर्षांनी अपडेट करावे लागत असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे ते आधारकार्ड अपडेट केले नव्हते. आता अपडेट करण्यासाठी शंकरपूर ग्रामपंचायत मध्ये गेली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी