महाराष्ट्र

Dasara Melava 2024; Mumbai traffic updates : शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यामुळं मुंबईतील वाहतुकीत बदल, 'हे' मार्ग राहतील बंद

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत

Published by : shweta walge

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार, दादर भागातील काही रस्ते बंद राहणार आहेत तर काही ठिकाणी पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे.

दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. त्यामुळं प्रचंड गर्दी उसळते. अशा वेळी गैरसोय होऊ नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाहतुकीत करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे यंदा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

वाहतुकीतील बदलाचा तपशील पुढीलप्रमाणे...

सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून एसव्हीएस रोडवरील माहीममधील कापड बाजार जंक्शनपर्यंतचा रस्ता बंद राहील. प्रवासी सिद्धिविनायक जंक्शन, एस. के. बोले रोड, आगर बाजार, गोखले रोड आणि पोर्तुगीज चर्च गेट मार्गाचा वापर करू शकतात.

राजा बडे चौकापासून उत्तर जंक्शनमधील केळुसकर मार्ग बंद राहणार आहे. या मार्गाऐवजी एलजे रोड, स्टील मॅन जंक्शन आणि गोखले रोड हा पर्यायी मार्ग आहे.

गडकरी चौक जंक्शन ते केळुसकर रोड (दक्षिण) दादर रोड असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांनी एमबी राऊत मार्गाचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

जंक्शनवरील सेनापती बापट मार्ग ते एलजे मार्ग ते मनोरमा नगरकर मार्ग या मार्गावरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

या ठिकाणी पार्किंगवर बंदी

एल जे रोड (राजबडे जंक्शन ते गडकरी जंक्शन)

एसव्हीएस रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक)

दादरमधील एनसी केळकर मार्ग (गडकरी ते हनुमान मंदिर जंक्शन)

दादरचा केळुसकर रोड (दक्षिण आणि उत्तर)

लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग (गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन)

एमबी राऊत रोड (एसव्हीएस रोडसह जंक्शनवरून)

दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शन)

पांडुरंग नाईक रोड (एमबी राऊत रोड)

पुण्यात मनसेला मोठा धक्का; सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र

Sulbha Gaikwad यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कल्याणमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

नरहरी झिरवळ यांचं शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले...

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून रोहित पवार यांच्या 'या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण