प्रशांत जगताप | सातारा | तापोळा महाबळेश्वर रोड जिवघेण असल्यामुळे स्थानिक पदचारी आणि वाहने यांना येता जाता त्रास होत आहे. या रस्त्याचे काम अजून पुर्ण झाले नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याच काम लवकरात लवकर करावे अशी मागणी स्थानिक करत आहे.
साताऱ्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. तापोळ्याहून महाबळेश्वरला जाणारा रस्ता निसरडा बनून खचला आहे. या मार्गावरून स्थानिकांसह अनेक पर्यटक जात असून हा रस्ता पूर्णपणे धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसाने तापोळा महाबळेश्वर रस्ता पूर्णपणे खराब झाला असून या मार्गावरून आज देखील रुग्णांना डालग्यात बसवून न्यावे लागत आहे. या दुर्गम भागातील रस्त्यांकडे महाबळेश्वरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.