महाराष्ट्र

Dahihandi 2021 | “हिंदूंचे सण साजरे करतानाच सबुरीचा सल्ला का?”

Published by : Lokshahi News

कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र, दहीहंडी साजरी करण्यावर विरोधी पक्षांचं एकमत झाल्याचं चित्र आहे. भाजपा आणि मनसे दोन्ही पक्षांचे नेते सार्वजनिक दहीहंडी साजरी करण्यावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. "हिंदूंचे सण साजरे करतानाच सबुरीचा सल्ला का?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसेच राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. राज्यातील मंदिरं, धार्मिक स्थळे सुरू करण्यावरूनही महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोपाळभक्त, मंत्री, राजकीय नेते आणि दहीहंडी मंडळांच्या सभासदांसोबत बैठक घेतली. यंदा दहीहंडी साजरी होणार की नाही, या निर्णयाकडे सर्वाचं लक्ष्य वेधलं होतं. अखेर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवून यावरील पडदा हटवला. सार्वजनिक दहीहंडी उत्सवावरील बंदी कायम ठेवली. सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर ठेवत महाविकास आघाडीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. आम्ही दहीहंडी करण्यावर ठाम असल्याचे राम कदम यांनी सांगितले. मनसेने देखील याला पाठिंबा दर्शवला आहे.

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन