"आज जरी सिरम अब्जाधीश असली तरी जगात सर्वात स्वस्त लस आम्ही पुरवतो, आदर पुनावाला हि परंपरा कायम ठेवेल" असा दावा सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनवाला यांनी व्यक्त केला.लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते.नुकताच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पार पडला.त्या पुरस्कार सोहळयाला माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ.दीपक टिळक उपस्थित होते."
पुनावालानी मोदी सरकारचे कौतुक करताना म्हंटले "मोदींच्या काळात ब्युरोक्रॅट्सचा त्रास झाला नाही म्हणून लस लवकर मिळत आहे. देशातील लायसनिंग राजमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. आता हे प्रमाण काहीसे कमी झाल्यामुळेच आम्ही कोव्हिशिल्डचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले".अशा शब्दात पुनावालानी मोदीचे कौतुक केले.
पुढे ते म्हणाले "कोविशिल्डला परवानगी मिळण्याच्या आधीच आम्ही काही कोटी डोस तयार करण्याची रिस्क घेतली. त्यांना जर वेळेवर परवानगी नाही मिळाली तर कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक वाया गेली असती. आमच्या कुटुंबाने लस स्वस्त देऊन त्याग केला".