दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
1 नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 15.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही. दरम्यान, या वाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 2000 रुपयांच्या पुढे गेला आहे. पूर्वी तो 1733 रुपये होता. मुंबईत 1783 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर आता 1950 रुपयांना मिळणार आहे.