बंगालच्या (Bengal)उपसागरात चक्रीवादळाची (cyclonic storm)शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात तापमान आणखी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानाची विदर्भाला सर्वाधिक झळ बसली आहे. चंद्रपुरात 43 अंश सेल्सिअस तर अकोला येथे 42.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
बंगालच्या (Bengal)उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे असनी चक्रीवादळ चारच दिवसात अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता आहे. हे २०२२ मधलं पहिलं वादळ आहे. अंदमानला धडकल्यानंतर ते बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने जाण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र २१ मार्चपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे राज्यात उन्हाचे चटके आणखी वाढणार आहेत. येत्या काही दिवसांत ते चक्रीवादळात रूपांतर होईल. त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट येणार आहे. त्यात गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि ओडिशात खूप जास्त तापमान नोंदवण्याची शक्यता आहे.