महाराष्ट्र

Cyclone Biparjoy : मुंबईतील जुहू बीचवर ६ जण बुडाले

बिपरजॉय या चक्रीवादळाने आता भयंकर रुप घेण्यास सुरुवात केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बिपरजॉय या चक्रीवादळाने आता भयंकर रुप घेण्यास सुरुवात केली आहे. हे वादळ 15 जून रोजी गुजरातमधील कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. परंतु, याचा परिणाम मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दिसत असून उंच लाट उसळत आहेत. अशातच, मुंबईतील जुहू बीचवर सहा जण बुडाले आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील किनारपट्टीवर दिसत येत आहे. जुहू बीचवर सहा जण समुद्रात गेले असता उंच लाटांमुळे सर्वजण वाहून गेले. उपस्थित लोकांनी तातडीने धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. यात दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, चार जण बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे. बिपरजॉयमुळे लाटा उसळत असल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहे.

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. वास्तविक, बिपरजॉय हे चक्रीवादळ धोकादायक बनले असून 15 जून रोजी ते पश्चिम किनारपट्टीवर पोहोचू शकते. बिपरजॉयमुळे मुंबईतील हवामान खराब होत असून विमान उड्डाणांचे वेळापत्रक बिघडले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी