अमरावती | खासगी खरेदी केंद्र व कापसाच्या समर्थन मूल्यापेक्षा अधिक दर मिळत आहे त्यामुळे पणन महासंघाच्या खरेदी केंद्राची अद्याप मागणी केली नाही शासकीय खरेदी केंद्राचे अद्यापही अनिश्चितता आहे.याबाबत 27 नोव्हेंबर नंतर निर्णय होण्याची शक्यता आहे या दरम्यान खुल्या बाजारात कापूस खरेदी सुरू आहे.
अमरावती कापूस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे अमरावती जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये खाजगी खरेदी केंद्र सुरू झाले आहे.त्यामध्ये,आठ हजारपेक्षा अधिक प्रतिक्विंटल कापसाला दर देण्यात आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे मात्र गतवर्षीच्या तुलनेत कापसाचे उत्पादन यावर्षी मात्र घटले आहे.