राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातच आता ओमायक्राॅनचा शिरकाव झाला आहे. राज्यात आता कोरोनाच्या रुग्णयेंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यावर आरोग्यमंंत्री राजेश टोपेंनी चिंता व्यक्त केली आहे. जर का काळजी न घेता निष्काळजीपणा केला तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असं सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे.
यासोबतच ते म्हणाले की,दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. जुने सर्व निर्बंध त्यांनी आणले आहेत. मॉल्स, रेस्तराँ, लग्न सर्वांवर निर्बंध लावले आहेत. आपल्याकडे जर आपण सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत करोनाचे नियम कठोरपणे पाळावे लागतील.
राजेश टोपेंनी सांगितले की, "मागील आठ दिवसात पाहिलं तर २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, आज १३०० केसेस आहेत. आज संध्याकाळी रिपोर्ट होतील त्यातून अंदाजे २२०० केसेस रिपोर्ट होतील. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत.