राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी रोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे . आज 9,195 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,634 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून. 58,28,535 रुग्णांना बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. आज दिवसभरात राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत जास्त दिसून आली आहे.
राज्यात एकूण 1,16,667 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.01% झाले आहे. त्यामुळे निर्बंध जरी शिथिल झालेले असले तरी, नागरिकांनी करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे यावरून दिसत आहे.
दरम्यान, राज्यात आजपर्यंत एकूण ५८,२८,५३५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.