सांगलीच्या ग्रामीण भागात झळकलेल्या एका अनोख्या फलकाची जोरदार चर्चा आहे. पुराच्या काळात सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा मजकूर विवेकानंद मंडळाने आपल्या फलकावर लिहिला.
या पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप असून विद्यमान सरकारबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या अनोख्या फलकाची सांगलीत जोरदार चर्चा आहे. विवेकानंद मंडळाच्या सदस्यांनी आपल्या मंडळाच्या फलकावर लिहिलेला हा मजकूर सरकारचे वाभाडे काढणारा आहे.
सरकारने वाऱ्यावर सोडले तर आपले लोक आपली जबाबदारी असे म्हणत मंडळाचे अध्यक्ष राहुल बोळाज आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या पूरपरिस्थितीत गावभागातील नागरिकांना मदत केली.
मात्र सरकारची ही जबाबदारी असताना सरकारी यंत्रणा मात्र गावभागात पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. असा मजकूर लिहीत कोणत्याही अडचणीसाठी संपर्क साधण्याचे आणि एकमेकांना मदत करण्याचा संदेशही या फलकातील मजकुरातून स्पष्टपणे दिसत आहे.