सुरेश वायभट | पैठण: पैठण येथे श्रीराम कथेची आज सांगता करण्यात आली. समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतुन सात दिवस राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाविकांनी भरभरून प्रतिसाद देत कथा श्रावनाचा आनंद घेतला, विलास संदिपान भुमरे, यांनी या कथेचे आयोजन केले होते.
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत श्रीराम कथेची सांगता करण्यात झाली. यावेळी वर्षा विलास भुमरे व विलास संदिपान भुमरे यांनी राम सिताची वेशभुषा साकरली तर लक्ष्मण शेखर शिंदे, तथा हनुमानाच्या भुमिकेत शिवराज पारिक यांनी हुबेहूब वेशभूषा परिधान केल्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी नंदलाल काळे, राजुनाना भुमरे, दादा बारे, किशोर चौहान, शहादेव लोहारे, दिपक आहुजा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहीया, ज्ञानेश्वर उगले, बलराम लोळगे, रामेश्वर सुसे, पुष्पाताई भुमरे, वर्षाताई भुमरे, पुष्पाताई गव्हाणे, ज्योतीताई काकडे यांच्यासह भाविकांची उपस्थिती होतीकांची मोठी उपस्थिती होती. सांगता प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.