खेड तालुक्यातील तळे या गावी उद्योजक कुंदन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी मिळून सामूहिक शेतीचा प्रकल्प राबवला आहे. गेल्या वर्षी नाचणीची मोठ्या प्रमाणात लागवड त्यांनी केली होती. या लागवडीला त्यांना चांगले यश देखील मिळाले होते. या वर्षी देखील तळे गावातील ग्रामस्थांनी सामूहिक शेती करत एक एकरमध्ये वरी, तर एका एकरात 'रत्नागिरी ७ लाल तांदूळ' लावला आहे. हा तांदूळ डायबेटीस रुग्णांसाठी देखील अतिशय उपायकारक आहे.
आज या सामुदायिक शेतीमध्ये लावणी करताना लहान मुलांसाहित वयोवृद्ध, देखील रममाण झाले आहेत. या सामूहिक शेतीच्या माध्यमातून तळे ग्रामस्थांनी सामूहिक शेतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.