अभिजीत हिरे | भिवंडीत दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. शहरात कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याने आज स्वतः आयुक्त सुधाकर देशमुख हे अॅक्शन मोड मध्ये येत कारवाई केली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनांवर कारवाई करण्यास आली आहे.
भिवंडी शहरात ही मागील चार दिवस सतत रुग्ण संख्या शंभरी पार करीत आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे.त्यामुळे कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः आयुक्त सुधाकर देशमुख हे अॅक्शन मोड मध्ये आले असून स्वतः अधिकारी कर्मचारी यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनांवर कारवाई करण्यास सरसावले आहेत.
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी वंजारपट्टी नाका येथील सुप्रसिद्ध हॉटेल बारादरी येथे स्वतः तपासणी केली असता तेथील कर्मचारी कामगार हे लसीकरण न केलेले आढळून आले तर 50 टक्के क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक त्याठिकाणी बसलेले आढळून आल्याने आयुक्तांनी हॉटेल वर दंडात्मक कारवाई करीत हॉटेल सील केले.तर त्या सोबतच अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे ,उपायुक्त दीपक झिंजाड सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या प्रभागात कारवाईस सुरवात करीत अनेक हॉटेल्स वर दंडात्मक कारवाई सोबत हॉटेल सील करण्याचा धडाका लावला आहे. ज्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.