येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री सचिव यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत कॉलेज सुरू करण्याबाबत सखोल चर्चा झाली. UG, PG आणि अभियांत्रिकीचे कॉलेज 20 ऑक्टोबर पासून सुरू करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. कॉलेज प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवा असेही त्यांनी म्हटले आहे.
वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असणार आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा सर्वस्वी अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असतील.विद्यापीठ महाविद्यालय वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असतील. तसेच डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांच लसीकरण पूर्ण झालं पाहिजे.ज्या विद्यार्थ्यांना हजर राहता येणार नाही त्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी
वसतिगृह हे टप्प्या टप्प्याने सुरू करावेत अशा सूचना उदय सामंत यांनी दिल्या.