महाराष्ट्र

तटरक्षक दलाची कामगिरी : ३ बोटी ताब्यात घेत शस्त्रांसह ५००० कोटींचे ड्रग्ज जप्त

Published by : Lokshahi News

तटरक्षक दलाच्या वरळीत मुख्यालय असलेल्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात गुरूवारी मोठी कारवाई केली.तटरक्षक दलाने अरबी समुद्रात कारवाई करून मोठ्या घातपाताचा डाव उधळला. संशयित नौकेला घेराव घालून जवळपास ४९०० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा, पाच एके ४७ (AK47) रायफल आणि १ हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही कारवाई करण्यात आली.
अंमली पदार्थांचा साठा, रायफली आणि काडतुसे घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत असलेल्या नौकेला घेराव घालून हा शस्त्रसाठा जप्त केला.

तटरक्षक दलाकडून संशयित नौकेला घेरून त्याची तपासणी करण्यात आला . त्यावेळी नौकेमध्ये तब्बल ४९०० कोटी रुपयांचे १६०० किलो अंमली पदार्थ सापडले. याशिवाय पाच एके ४७ रायफल तसेच १ हजार जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. समुद्री संरक्षण मोहिमेंतर्गत समुद्री तसेच हवाई समन्वयाने ही कारवाई केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही थरारक कारवाई करण्यात आली.

तटरक्षक दलाची गस्ती नौका गस्त घालत असताना तीन मच्छिमार नौका संशयास्पद स्थितीत दिसून आल्याची माहिती मिळाली. विमानाने टेहळणी करून संबंधित नौकांबद्दल अधिक माहिती तसेच नेमके ठिकाण गस्ती नौकेला कळवले. यानुसार गस्ती नौकेने या तिन्ही मच्छिमार नौकांना घेराव घातला.

तीनपैकी 'रवीहंसी' ही श्रीलंकन मच्छिमार बोट अमली पदार्थ व रायफल घेऊन भारतीय किनारपट्टीवर येत होती. अन्य दोन नौका तिला संरक्षण पुरवत होत्या. तिन्ही नौकांसह त्यावरील १९ खलाशांना तटरक्षक दलाने ताब्यात घेत मोठ्या घातपाताचा कट उधळला.

२६/११ च्या वेळी अतिरेक्यांनी भारतीय बोटी ताब्यात घेवून मुंबईवर हल्ला केला होता. हा प्रकारदेखील असाच आहे का ? या संदर्भात तपास चालू आहे.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय